The Paragraph Of Life
जीवन म्हणजे काय विचारल तर प्रत्येकाची व्याख्या वेगळीच असते. जीवनात कितीतरी प्रसंग घडतात पण काही व्यक्तीच त्या प्रत्येक प्रसंगातून काहीतरी शिकतात.
कधी कधी खुप संकट येतात पण त्या संकटांना सामोरे जाणे, त्यांना सोडवणे आणि त्यातून काही नविन शिकणे ह्यातच जीवनाचा सार आहे. असाच एक जीवनाचा परिच्छेद मी तुम्हाला सांगणार आहे.
माझ शिक्षण पुर्ण झाल. शिक्षण घेत असताना माझ्या मनात खुपदा येऊन गेल की जॉबसाठी मुंबई जायच. नेहमी प्रमाणे सुट्टीत मी मुंबईला आली त्यानंतर मी परत माझ्या गावी गेलीच नाही.
मुंबईला मी खूप ठिकाणी इंटरव्हिव दिले पण कुठूनच रिस्पॉन्स येत नव्हता. नंतर विचार केला की एक हा शेवटचा इंटरव्हिव देऊ जर सिलेक्ट झाल तर इथेच थांबायच नाहीतर परत गावी निघून जायच.
इंटरव्हिव देण्याचा दिवस उजाडला, हे शहर तस माझ्या ओळखीच पण पहिल्यांदाच कामानिमित्त इथे आली होती. इंटरव्हिवला जातांना बरेच विचार मनात येत होते जसे "सिलेक्ट होईल ना आणि नाही झाली तर परत गावी जाव लागेल" असे बरेच विचार येत होते. पण त्या विचारांना मनावर हवी होऊन नाही दिले. मी इंटरव्हिव द्यायला गेली, इंटरव्हिव चांगला पण गेला त्यात त्यांनी सांगितले "आम्ही तुम्हाला काही दिवसात कळवू ".
८ - १० दिवस होऊन गेले पण त्यांचा कॉल काही आला नाही. मग मी स्वतःहून त्यांना कॉल करण्याचा विचार केला. विचार मनात पक्का करुन त्यांना कॉल केला पण त्यांनी कॉल उचलला नाही.
बघा ना नशिब पण किती परिक्षा घेते. मी विचार केला की आता गावी जायची तयारी करायची पण काही कारणामुळे मी मुंबईलाच थांबली. १५ - २० दिवसांनी एक फोन आला तो फोन होता त्याच कंपनीचा जिथे मी इंटरव्हिव देऊन आली होती. त्यांच्या मॅनेजर म्हणाले "उद्या लॅपटॉप घेऊन २ महिन्याच्या इंटर्नशिपसाठी या ,त्यानंतर जोईनींग देऊ ".
त्यावेळेस मला हे समजल की मी सर्व सोडून हारून गावी निघून गेली असती तर मी ही संधी गमावली असती.
कथेचा सार : " ह्यातूनच हे समजत की जर थोडा धीर ठेवला तर त्याच फळ नेहमी चांगलच मिळत "
"तुमच्या सोबत पण कधी तरी काहीना काही घडल असेल, असा प्रसंग आला असेल की त्या वेळेस समजत नसेल काय करायच. अश्या वेळेस तुम्ही काय केल तुम्ही तुमच्या जीवनाच्या परिच्छेदातून काय शिकला ? "

मस्त. अशी वेळ माझ्या सोबत येते पण तेव्हा जाणवत की काही चुकतंय पण भविष्यात समजत की जे झालं ते चांगल्यासाठी झालेलं.
ReplyDelete